Posts
- Get link
- X
- Other Apps
लहानपण देगा देवा... आपण आपलेपण जपायला सहज शिकून जातो, अगदी आपल्याही नकळत; परंतु आपल्यातील आपलेपणा विसरुनच जातो, अजानतेपणाने नव्हे तर जाणूनबुजून. ह्याचं कारण आपण आपल्यातील थोरपण शोधत जगत असतो, इतरांचं थोरपण नजरेआड करुन. आपल्या कर्तृत्वाची उंची आपल्या आभाळात पोहचलेल्या पायांपासून मोजायची नसते तर आपल्या जमीनीवरील पायांपासून मोजायची असते हेच आपण विसरुन गेलेलो असतो. खरंतर आपण खूप काही विसरुन गेलेलो असतो ह्या कालौघात, अगदी आपलं स्वच्छ आणि सुंदर बालपणही. तुकारामांनी 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...'अशी मागणी विठ्ठलाकडे केली आणि आपण स्वतःच स्वतःचं बालपण आपल्या हातानं संपवून टाकलं, ऐरावताचं सोंग घेत. आपल्या संपूर्ण जीवनात ऐरावत बनण्याच्या चढाओढीत आपण आपल्याशी आणि आपल्यांशी चढाओढ करतो आहे, आपल्यांनाच आपल्या पायांखाली तुडवतो आहे ह्याची तमाही आपण बाळगलेली नसते. कालांतराने आपण आपल्याला ऐरावत समजून घेतो आणि अहंकाराचे चित्कार करीत आपल्यातील बळाचे स्तोम माजवत अधिकाधिक मदमस्त होत जातो. खरंतर एवढ्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण कुणीच नसतो. परंतु आपली स्थिती किंवा कुवत केवळ एक...
- Get link
- X
- Other Apps
आगळी व्यक्तीमत्वे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नवनवीन लोकांना भेटत असतो , नवनवीन अनुभव घेत असतो, नवनवीन वृत्ती आणि प्रवृत्तींसोबत वावरत असतो. ह्या भेटींमधून,अनुभवांतून नवीन काही शिकत असतो, त्यातून आनंद आणि समाधान प्राप्त करीत असतो. आयुष्याच्या ह्या प्रवासात किती व्यक्ती त्यांच्या वृती, प्रवृती आणि प्रकृतीची ओळख झाल्यावर, त्यांच्यातील वेगवेगळ्या रसायनाच्या अभ्यासामधून आपल्याला नवीन उर्जाही प्राप्त होत असते. ह्या उर्जेतून जगण्याच्या नवीन कलेची जाणीव होत असते. खरंतर माणसं माणसं असतात हे एक साधारण आणि सामान्य वाक्य ; परंतु ह्या माणसातलं माणूसपण आणि वेगळेपण प्रत्येकाच्या आगळ्या व्यक्तिमत्वाची दखल घ्यायला भाग पाडत असतं. प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख असते आणि हीच ओळख प्रत्येकाला एकमेकांच्या व्यक्तीमत्वाकडे अधिक आकर्षित करीत असते. आपल्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वांमधून भेटणारी ही माणसं ही कधी आपलीही असतात , कधी आपली नसली तरी आपली वाटणारी असतात आणि आपल्यातील आप...
हिंदी कविता
- Get link
- X
- Other Apps
अब क्या फायदा रात आयी अगर रुकने मेरे यहॉ , चिरागो को जलाने से क्या फायदा ॥ जिंदगी के बाद मौत लिखी ही है , घुटके घुटके मरने से क्या फायदा ॥ दर्दे दिलको जो अबतक सवॉरा है , सूखे ऑसु भुलाने से क्या फायदा ॥ जिंदगी ने दामन जो छोडा ही है , मौतको अब रुकाने से क्या फायदा ॥ दिल मे दिलभी नही , दर्दे दिल भी नही , ऐसे दिल को लगाने से क्या फायदा ॥ ख्वाब मे ही अगर हमको रखा नही , आमने सामने से अब क्या फायदा ॥ रोकने के लिये अब ना आये कोई , जाम को रोकने से अब क्या फायदा ॥ मधुसूदन (मदन) पुराणिक मोबा.9403194400